पुजाराने तिसऱ्या टेस्टमध्ये केला रेकॉर्ड
भारताचा क्रिकेटर चेतेश्वर पुजाराने रविवारी ऑस्ट्रेलियाविरोधात तिसऱ्या टेस्टमध्ये इतिहास रचला. पुजाराने मोठी इनिंग खेळली आहे. पुजाराने 149व्या ओव्हरमध्ये नाथन लियोनच्या पाचव्या बॉलवर एक खास रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.
रांची : भारताचा क्रिकेटर चेतेश्वर पुजाराने रविवारी ऑस्ट्रेलियाविरोधात तिसऱ्या टेस्टमध्ये इतिहास रचला. पुजाराने मोठी इनिंग खेळली आहे. पुजाराने 149व्या ओव्हरमध्ये नाथन लियोनच्या पाचव्या बॉलवर एक खास रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.
हा त्याच्या इनिंगमधला 390वा बॉल होता. अहमदाबादमध्ये नोव्हेंबर २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने खेळलेल्या इनिंगला मागे टाकलं. पुजाराने तेव्हा ३८९ बॉलचा सामना खेला होता. तेव्हा त्याने नॉट आऊट २०४ रन केले होते.
रांची टेस्टमध्ये टीम इंडिया संघर्ष करतांना दिसत आहे. पुजाराने एकीकडे डाव सांभाळला पण दुसऱ्या बाजून विकेट पडत गेल्या. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने पाचव्यांदा १५० चा आकडा पार केला आहे. कोणत्याही भारतीय फलंदाजाला टेस्टमध्ये ४०० जास्त बॉल खेळण्याची संधी १३ वर्षानंतर आली.
भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधित बॉलचा सामना करण्याचा रेकॉर्ड राहुल द्रविडच्या नावावर आहे. त्याने २००४ मध्ये पाकिस्तान विरोधात ४९५ बॉल खेळले होते. त्या सामन्यामध्ये त्याने २७० रन केले होते.