दिल्ली: दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्धच्या मॅचमध्ये पुण्याचा सात विकेट्सनी विजय झाला आहे. या विजयामुळे आयपीएलमधली पुण्याची पराभवाची मालिका संपली आहे. 163 रनचा पाठलाग करताना पुण्याला चांगली सुरुवात मिळाली. ओपनर अजिंक्य रहाणे आणि आपला पहिलाच आयपीएलचा सामना खेळणाऱ्या उस्मान ख्वाजानं 59 रनची पार्टनरशिप केली. पण उस्मान ख्वाजा 30 रनवर आऊट झाला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर सौरभ तिवारी (21) धोनी(27) आणि थिसारा परेरानं(नाबाद 14) रन करून अजिंक्य रहाणेला चांगली साथ दिली आणि पुण्याचा विजय निश्चित केला. अजिंक्य रहाणेनं 48 बॉलमध्ये नाबाद 63 रन बनवल्या. अजिंक्य रहाणेलाच मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. 


याआधी टॉस जिंकून पुण्यानं दिल्लीला पहिले बॅटिंग दिली. या मॅचमध्ये दिल्ली कॅप्टन झहीर खान आणि क्वांटन डिकॉक शिवाय मैदानात उतरली होती. या प्रमुख खेळाडूंशिवाय खेळताना दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 162 रन बनवता आल्या. दिल्लीकडून डुमनीनं सर्वाधिक 34 रन केल्या.  दिल्लीविरुद्ध मिळवलेल्या या विजयामुळे पॉईंट्स टेबलमध्ये पुणे सहा पॉईंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे.