पुणे : घरच्या मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाबला पराभवाची धूळ चारत पुण्याने दिमाखात बाद फेरीत प्रवेश केलाय. यासोबतच संघाने पॉईंटटेबलमध्ये दुसरे स्थान मिळवलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सामना जिंकल्याने पुण्याचे 18 पॉईंट झाल्याने ते दुसऱ्या स्थानावर पोहोचलेत. त्यामुळे प्लेऑफचा सामना मुंबईशी होणार आहे. 


मुंबई आणि पुणे यांच्यात पहिली क्वालिफायर होणार आहे. तर दुसरा सामना कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. 


पुण्याने प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबला अवघ्या 73 धावांत रोखले आणि सोपा विजय मिळवला.