मुंबई : टी-२० वर्ल्डकपदरम्यान भारताचा लेगस्पिनगर आर. अश्विन आणि हरभजन सिंग यांनी एकमेकांच्या भाषेत संवाद साधलेला व्हिडीओ यूट्यूबवर चांगलाच प्रसिद्ध झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्विनची भाषा तामिळ आहे. तर हरभजन सिंग पंजाबी आहे. दोघेही एकमेकांची भाषा शिकण्याचा प्रयत्न करत होते. अश्विनने तामिळ भाषेत एक वाक्य हरभजनला म्हणायला सांगितले. हरभजनने ते वाक्य म्हटलेही मात्र ते ऐकण्यास इतके फनी होते की अश्विनला काही हसू आवरले नाही. 


त्यानंतर हरभजन सिंगने पंजाबी भाषेतील एक वाक्य अश्विनला बोलायला सांगितले. मात्र अश्विनला ते तितकंस काही जमलं नाही. या दोघांचा संवाद पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.