हैदराबाद : रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या कॅरोलिना मरिनकडून भारताची बॅडमिंटन स्टार पी.व्ही.सिंधूला पुन्हा पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रीमिअर बॅडमिंटन लीगच्या पहिल्याच सामन्यात हैदराबाद हंटर्सकडून खेळणाऱ्या मरिनने चेन्नईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सिंधूचा पराभव केला. मरिनने सिंधूला ८-११,१४-१२,२-११ असे हरवले. 


रिओ ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात सिंधूला मरिनकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर दुबई सुपर सिरीज स्पर्धेत सिंधूने मरिनला हरवत पराभवाचा बदला घेतला होता. 


त्यानंतर या सलामीच्या सामन्यातच मरिनने सिंधूवर वर्चस्व मिळवले. पहिल्या गेममध्ये सिंधूला चांगला खेळ करता आला नाही. मात्र दुसऱ्या गेममध्ये तिने जोरदार कमबॅक केले. मात्र तिसऱ्या गेममध्ये मरिनने सरशी साधली आणि विजय मिळवला.