विशाखापट्टणम : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी भारताच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करताना भारताला विजय मिळवून दिला. पहिल्या सत्रात आर. अश्विन आणि जडेजा यांनी विकेट मिळवत इंग्लिश फलंदाजांवर चांगला अंकुश ठेवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र या सामन्यातील विजयाआधीच अश्विनने मोठा इतिहास रचलाय. कसोटीच्या शेवटच्या दिवशी स्टार स्पिनर अश्विनने ज्यो रूटची विकेट घेत या वर्षात 55 विकेट घेण्याचा विक्रम केलाय. त्यासोबतच यंदाच्या वर्षात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या श्रीलंकेच्या रंगना हेरथला त्याने मागे टाकलंय.


या क्रमवारीत रंगना दुसऱ्या स्थानावर घसरलाय. त्याच्या नावावर 54 विकेट आहेत. हेराथने या वर्षात 8 कसोटी सामन्यांत पाच वेळा पाच विकेट आणि दोनवेळा 10 विकेट घेत एकूण 54 बळी मिळवलेत. 
    
तसेच सलग दुसऱ्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये 50हून अधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अश्विनने दुसरे स्थान मिळवलेय.