सेंट लुशिया :  भारताचा ऑलराउंडर आर अश्विनने विडिंज दौऱ्यात पहिल्या टेस्टनंतर आज दुसरे शतक लागावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्विनने षटकार लगावून आपलं शतक पूर्ण केले. 


अश्विनने विडिंज विरोधात आणि करिअरमधील चौथे शतक पूर्ण केले. यापूर्वी मायदेशात दोन आणि पहिल्या कसोटीत शानदार १०० धावांची खेळी केली होती. 


भारताची स्थिती ५ बाद १२६ अशी स्थिती असताना आर. अश्विन आणि वृद्धीमान साहा यांनी शानदार खेळी करत १९० धावांची भागीदारी करत  दुसऱ्या दिवसाच्या लंचपर्यंत ५ बाद ३१६ पर्यंत नेऊन ठेवला. 


लंचपर्यंत अश्विन २५७ चेंडूंचा सामना करत ५ चौकारांसह ९९ धावांवर खेळत होता तर वृद्धीमान साहा २०८ चेंडूंचा सामना करत १२ चौकारांसह ९३ धावांवर खेळत होता.