मुंबई : आयसीसीच्या क्रिकेटविषयक समितीच्या अध्यक्षपदी भारतीय संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळेची आज पुनर्नियुक्ती झाली. शिवाय, दिग्गज फलंदाज राहुल द्रविचाही या समितीत समावेश आहे. या समितीची मुदत तीन वर्षे असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द्रविडसह श्रीलंकेचे माजी कर्णधार महेला जयवर्धने यांनाही क्रिकेटविषयक समितीवर संधी मिळाली आहे. या नव्या समितीची पहिली बैठक 31 मे-1 जून या कालावधीत लंडन येथे होणार आहे.


यापूर्वी, 2012 मध्ये कुंबळे यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. आता त्यांना मुदतवाढ मिळाल्याने ते 2018 पर्यंत या पदावर असतील.