बंगळुरु : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्या दहा वर्षीय समित या मुलाने १४ वर्षांखालील क्‍लब क्रिकेटमध्ये जोरदार फटकेबाजी केली. त्याने शतक ठोकले. 


समितने १२५ रन्स केल्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोयोला मैदानावार बंगळुरु युनायटेड क्रिकेट क्‍लबकडून (बीयूसीसी) समित द्रविड खेळत आहे. फ्रॅन्क अॅन्थोनी पब्लिक स्कूलच्या विरुद्ध खेळताना समित द्रविडने १२५ रन्स केल्या. त्यामध्ये १२ फोर मारलेत. प्रत्युष (१४३) आणि समितने २१३ रन्सची भागीदारी केली. दोघांनी केलेल्या दमदार भागिदारीमुळे ‘बीयूसीसी‘ने हा सामना २४६ रन्सने जिंकला. 


१२ वर्षांखाली चांगली कामगिरी


दरम्यान, समित द्रविडने गतवर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या १२ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. त्याला उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरविण्यात आले होते.