मुंबई : गुजरात लायंसचा कर्णधार सुरेश रैनाने शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सच्या विरोधात ८४ रनची शानदार खेळी केली. रैनाच्या या खेळीमुळे गुजरात लायंसने कोलकातावर विजय मिळवला. 188 रनचं टार्गेट त्यांनी सहज मिळवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रैनाने 46 बॉलमध्ये 84 रन केले. रैनाने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकत भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 6673 रन केले आहे.


टी-20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीचे सध्या 6667 रन आहेत. आयपीएलमध्ये रैनाने 4341 रन केले आहेत. याबाबतीत रैनाने कोहलीला मागे टाकलं आहे.


आयपीएलच्या 149 मॅचमध्ये सुरेश रैनाने 4267 रन बनवले आहेत. विराट कोहलीने 134 मॅचमध्ये 4264 रन केले आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक रनच्या बाबतीत दोघांमध्ये स्पर्धा पाहायला मिळते आहे.