इंदूर : कर्णधार पार्थिव पटेलच्या शानदार खेळीने गुजरातने प्रथमच रणजी चषकावर आपले नाव कोरले. गुजरातने मुंबईचा पराभव करत ८३ वर्षांनी प्रथमच रणजी करंडक पटकावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईने गुजरातसमोर ३१२ धावाचं आव्हान ठेवलं होतं. पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा लक्ष्याचा पाठलाग करणा-या गुजरातने ४७ धावांवर बिनवाद अशी सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर गुजरातने लगेचच आपले तीन विकेट्स गमाल्यात. त्यामुळे मुंबईची सरशी होईल असे वाटत होते. मात्र पार्थिव पटेलने एका बाजूने भक्कम खेळी करत संघाला विजयाकडे नेले.  पार्थिवने १४३ धावा केल्यात.


चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पार्थिवने कर्णधाराला साजेशी खेळी करत गुजरातचा डाव सावरला. सलामीवीर समित गोहिल, मनप्रीत जुनेजा यांना साथीला घेत पार्थिवने गुजरातला पहिल्यांदा रणजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावून दिले.
 
मुंबईने गुजरातसमोर ठेवलेलं ३१२ अशी मोठी धावसंख्या ठेवली. मात्र, आतापर्यत तीन वेळाच पार करण्यात प्रतिस्पर्धी संघ यशस्वी ठरला होता. मुंबईने आतापर्यंत 40 वेळा रणजी जिंकला असून शिरपेचात अजून एक तुरा रोवण्याची संधी त्यांच्याकडे होती. मात्र पार्थिव पटेल ती हिरावून घेतली.