नवी दिल्ली : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान धर्मशाळा इथं सुरू असलेल्या चौथ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने अर्धशतक ठोकून टीम इंडियाला भक्कम साथ दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धर्मशाळा टेस्ट मॅचमध्ये रविंद्रनं टेस्ट क्रिकेट करिअरमधल्या १००० धावा आणि १०० बळी असा 'दुहेरी' विक्रम पूर्ण केलाय. हा विक्रम करणारा तो दहावा भारतीय खेळाडू ठरला आहे.


हा विक्रम करुन सर जडेजानं कपिल देव आणि ऑस्टेलियाचा मिशेल जॉन्सन या खेळाडूंना मागे टाकलंय. 


पाहुयात त्यांनी केलेल्या धावा आणि घेतलेले बळी यांची यादी... 


- रविंद्र जडेजा - (५५६ धावा, ६८ बळी), २०१६-१७


- कपिल देव – (५५३ धावा, ६३ बळी), १९७९-८०


- मिशेल जॉन्सन – (५२७ धावा,६० बळी), २००८-०९