राजकोट : भारताचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजाचा साखरपुडा झाला आहे. हा सोहळा जडेजाच्या राजकोटमधल्या स्वत:च्याच रेस्टॉरंटमध्ये झाला. काही ठराविक पाव्हणेच या साखरपुड्याला उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जडेजाचा साखरपुडा रिवाबा सोलंकी हिच्याबरोबर झाला आहे. रिवाबानं दिल्लीमधून इंजिनिअरिंग केलं आहे, तसंच सध्या ती युपीएससीची तयारी करत आहे.  रिवाबाही राजकोटची असली तरी ती मुळची केशोद गावची आहे. 


गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटर्सच्या लग्नाचा सिलसिला सुरु आहे. हरभजन सिंग, रोहित शर्मा आणि वरुण आरोन हे क्रिकेटपटू विवाहबंधनात अडकलेत. वेगवान गोलंदाज मोहित शर्माचाही साखरपुडा झालाय.