रांची : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाची टीम ४५१ रन्सवर ऑलआऊट झाली. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव स्मिथ (178*) आणि ग्लेन मॅक्सवेल (104) ने शतक ठोकलं. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजाने ५ विकेट घेतले. सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ४ विकेट गमावून २९९ रन होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या दिवशी सामना सुरु होताच ग्लेन मॅक्सवेल (104) रनवर आउट झाला. ऑस्ट्रेलियाचा सहावा आणि और सातवा विकेट जडेजानेच घेतला.  ११६ व्या ओव्हरमध्ये तीन बॉलमध्ये २ विकेट घेतले. आठवां विकेट लंचनंतर पडला. जडेजाने नाथन लियोनला नायरच्या हाती कॅच देत ऑस्ट्रेलियाला नौवा झटका दिला.


शेवटच्या विकेट पडू नये म्हणून स्मिथने स्ट्राईक स्वत:कडेच ठेवली होती. जोश हेजलवुडला स्मिथ स्ट्राईक देत नव्हता पण जडेजाच्याच बॉलवर रन घेतांना जडेजाने न बघताच हेजलवुडला रनआऊट केलं.


पाहा व्हिडिओ