राजकोट : भारताचा ऑलराउंडर क्रिकेट रविंद्र जडेजाचा साखरपुडा शुक्रवारी रिवाबा सोलंकीशी होत आहे. सकाळी नऊ वाजता साखरपुडा होईल असे रिवाबाचे वडील हरदेवसिंह सोलंकी यांनी सांगितले. याबाबत रविंद्र अथवा त्याच्या कुटुंबियांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली येथून इंजिनीयरिंग करणारी रिवाबा सध्या यूपीएससीची तयारी करतेय. राजकोट येथील सरिता विहार सोसायटीत राहणारे सोलंकी मूळचे केशोद गावचे आहेत. साखरपुड्यासाठी सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन(एससीए)चे सचिव निरंजन शहा यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलेय. तेही या सोहळ्यात सामील होणार आहेत. टीम इंडियातीलही काही क्रिकेटपटू या समारंभासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 


गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटर्सच्या लग्नाचा सिलसिला सुरु आहे. हरभजन सिंग, रोहित शर्मा आणि वरुण आरोन हे क्रिकेटपटू विवाहबंधनात अडकलेत. वेगवान गोलंदाज मोहित शर्माचाही साखरपुडा झालाय.