अहमदाबाद : गुजरातमधील जामनगरमधून एक बातमी अशी येत आहे की, क्रिकेटर रवींद्र जडेजा आणि त्याची पत्नी कारमधून प्रवास करत असतांना अपघात झाला.


जडेजा त्याच्या पत्नीसोबत एकत्र घरातून बाहेर जाण्यासाठी निघाले होते. अचानक एक दुसरी गाडी त्यांच्या गा़डीसमोर आली आणि अपघात झाला. ही चारचाकी होती की दुचाकी याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण या अपघातात एक मुलगी जखमी झाली आहे. अपघातानंतर जडेजा आणि त्याची पत्नी स्वत: त्या मुलीला दवाखान्यात घेऊन गेले.