रिअल माद्रिदचा सध्याचा संघ व्यवस्थापक झिनेदिन झिदानचं मुंबईत आगमन
महान फुटबॉलपटू, फ्रान्सचा माजी कॅप्टन आणि रिअल माद्रिदचा सध्याचा संघ व्यवस्थापक झिनेदिन झिदानचं आज मुंबईत आगमन झालं.
मुंबई : महान फुटबॉलपटू, फ्रान्सचा माजी कॅप्टन आणि रिअल माद्रिदचा सध्याचा संघ व्यवस्थापक झिनेदिन झिदानचं आज मुंबईत आगमन झालं.
वांद्रे-कुर्ला संकुलातल्या कनकिया-पॅरीस या प्रोजेक्टच्या प्रचारासाठी झिदान आलाय. कनकिया स्पेसेस या रिअल इस्टेटमधल्या बड्या कंपनीनं झिदानला ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून साईन केलंय.
भारतात बांधकाम क्षेत्रातल्या एखाद्या कंपनीनं स्पोर्ट्समनला ब्रँड अॅम्बेसिडर करण्याची ही पहिलीच घटना असावी. स्वतः झिदानदेखील फारसा ब्रँड-फ्रेंडली नाही. मैदानावर आक्रमक, मात्र प्रत्यक्षात शांत राहणं तो पसंत करतो. शिवाय एखाद्या भारतीय कंपनीसोबत करार करण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे.
उद्या संध्याकाळी वरळीमध्ये कनकियानं आयोजित केलेल्या एका चर्चेतही झिदान सहभागी होईल. झिदानसह फास्ट बॉलर झहीर खान, अभिनेत्री बिपाशा बसू, फुटबॉलपट्टू बायचुंग भुतिया आणि शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरेदेखील सहभागी होणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या फॅशन शोमध्ये झिदान शो स्टॉपर म्हणून रॅम्पवॉक करेल.