ऑलिम्पिकमध्ये मेडल, साक्षी मलिकच्या आईची पहिली प्रतिक्रिया
माझ्या मुलीसोबत प्रत्येकाच्या शुभेच्छा होत्या. त्यामुळे ती चांगली प्रदर्शन करु शकली. ती चिकाटीने खेळ करत राहिली आणि तिने दोन सामने जिंकले.
नवी दिल्ली : माझ्या मुलीसोबत प्रत्येकाच्या शुभेच्छा होत्या. त्यामुळे ती चांगली प्रदर्शन करु शकली. ती चिकाटीने खेळ करत राहिली आणि तिने दोन सामने जिंकले.
क्वार्टर फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर तिने काही तक्रार केली नाही. मात्र, साक्षीची आई सुदेश म्हणाली, कुस्तीच्या मैदानातून ती बाहेर पडली त्यावेळी मनात थोडी नाराजी झाली. मात्र, मुलीने चांगली कामगिरी केल्याने आनंद होता.
दरम्यान, साक्षीचे वडील सुखबीर म्हणालेत, ऋषिकेशपासून नीळकंठपर्यंत अनवाणी जाणार. काही वर्षांपूर्वी केवळ ड्रेससाठी तिने कुस्ती खेळली होती. मात्र, एवढ्या उंचीपर्यंत पोहोचेल, असे मला वाटले नव्हते. साक्षीने लहान वयात ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड जिंकले. तर कॉमनवेल्थमध्ये सिल्वर मेडल जिंकले.