रिओ : सेरेना विल्यम्स आणि व्हीनस विल्यम्स या अमेरिकन जोडीचं ऑलिम्पिकमधील आव्हान पहिल्याच राऊंडमध्ये संपुष्टात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिफेंडिंग चॅम्पियन सेरेना-व्हीनस जोडीला चेक रिप्बलिकच्या लुसी साफारोव्हा आणि बार्बोरा स्ट्रीकोव्हाकडून ६-३, ६-४ अशा फरकानं पराभवाचा धक्का सहन करावा लागला. 


सेरेना-व्हीनस डिफेंडिंग चॅम्पियन्स असल्यानं त्या या मॅचमध्ये विजय मिळवणार असं वाटत होतं. मात्र, साफारोव्हा-स्ट्रीकोव्हा जोडीनं त्यांता दोन सेट्समध्येच धुव्वा उडवला. 


सेरेना-व्हीनसचा या मॅचपूर्वी ऑलिम्पिकचा विनिंग रेकॉर्ड हा १५-० असा होता. त्याचप्रमाणे त्यांनी २०००, २००८ आणि २०१२ मध्ये ऑलिम्पिकमध्ये वुमेन्स डबल्समध्ये ऑलिम्पिक 'गोल्ड'ला गवसणी घातली होती. यंदा मात्र त्यांना ऑलिम्पिकमधील आपला दबदबा कायम राखता आला नाही.