सिडनी : यंदा प्रथमच दुसऱ्या सीडिंगवर खेळणाऱ्या रॉजर फेडररनं ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. त्यानं अमेरिकेच्या नोआ रुबीन याचा 7-5, 6-3, 7-6 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तिसऱ्या सेटमध्ये फेडररनं दोन सेट पॉइंट वाचवले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे फेडररचा पारंपारिक प्रतिस्पर्धी स्टॅन वॉवरिंका यानंही स्टीव्ह जॉन्सन याचा सहज पराभव करत पुढली फेरी गाठलीये. अवघ्या 51 मिनिटांच्या खेळात वॉवरिंकानं 6-3. 6-4, 6-4 असा विजय मिळवला.  


टॉप सीडेड अँडी मरे याचं डावं मनगट दुखावलंय. रशियाचा अँड्रे रुबलेव याच्यासोबत झालेल्या सामन्यात मरे यानं 6-3, 6-0, 6-2 असा अगदी सहज विजय मिळवला असला तरी दुखापतीमुळे त्याच्या पुढच्या सामन्यांबाबत चाहते चिंतेत पडलेत.  


महिलांमध्ये टॉप सीडेड अँजेलिक कर्बर हिनं आपला 29वा वाढदिवस विजयासह साजरा केला. तिनं लोकल गर्ल कॅरिना विथोएफ्ट हिचा 6-2, 7-6, 6-2 असा पराभव केला.