मुंबई : आयपीएल सीझन ९ मध्ये मुंबई इंडियन्स आणि राइजिंग पुणे सुपरजायंट्स यांच्यामध्ये पहिला सामना रंगला. आयपीलमध्ये राइजिंग पुणे सुपरजायंट्सने ९ विकेट्सने विजय मिळवला. मुंबई इंडियन्स ही मागच्या सीझनची विजेती असल्याने दोघांमध्ये कांटे की टक्कर होईल असं वाटलं होतं पण पुण्याने सहज विजय मिळवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सने प्रथन बॅटींगचा निर्णय घेत ८ विकेट गमवत १२१ रन्स केले. पुणे टीमने हे टार्गेट फक्त १४.४ ओव्हरमध्ये पूर्ण केलं आणि फक्त एक विकेट गमावली.


मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर कर्णधार रोहितने म्हटलं की, ‘पिच ठीक वाटत होती पण आम्ही चांगली बॅटींग नाही केली. १२१ रन्स पुरेसे नव्हते. या मॅचमधून खूप काही शिकता आलं. आम्ही यावर बसून विचार करू.'


रोहित म्हणतो की, 'बॉलर्सला पिच ऐवढी मदत करेल याचा विचार केला नव्हता. आमची शॉट खेळण्याची पद्धत ही चुकली. ज्यामुळे आम्ही मॅच गमावली. आता आम्ही कोलकात्याला जाणार आहोत. तिथे आमचा रेकॉर्ड चांगला आहे. आता आयपीएलला सुरुवात झाली आहे. घाबरण्याचं काहीही कारण नाही.'