अंपायरशी हुज्जत घालणे रोहितले पडले महागात
रायजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान अंपायरशी हुज्जत घालणे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला चांगलेच महागात पडलेय. या सामन्यात मुंबईला पाच धावांनी पराभव पत्करावा लागला. मात्र त्याचबरोबर रोहित शर्माला दंडही बसला.
मुंबई : रायजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान अंपायरशी हुज्जत घालणे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला चांगलेच महागात पडलेय. या सामन्यात मुंबईला पाच धावांनी पराभव पत्करावा लागला. मात्र त्याचबरोबर रोहित शर्माला दंडही बसला.
अखेरच्या षटकात ही घटना घडली. मुंबईला अखेरच्या ४ बॉलमध्ये जिंकण्यासाठी ११ धावांची गरज होती. यावेळी उनदकटने टाकलेला तिसरा चेंडू यष्टीच्या खूप दुरुन गेला. रोहितच्या मते हा वाईड बॉल होता मात्र अंपायरनी असा कोणताही निर्णय दिला नाही.
अंपायरच्या या निर्णयावर रोहित मात्र चांगलाच नाराज झाला. यासाठी तो अंपायरशी वाद घालू लागला. त्याच्या या कृतीमुळेच त्याला दंड म्हणून मानधनातून ५० टक्के रक्कम कापण्यात आलीये.