मुंबई : टीम इंडियाचा क्रिकेटर युवराज सिंह आणि त्याची पत्नी अभिनेत्री हेझल किच त्यांच्या चाहत्यांना लवकरच एक आनंदाची बातमी देऊ शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेझल आणि युवीच्या लग्नाला चार महिने पूर्ण झालीत. अशातच लवकरच या जोडप्याच्या संसाराच्या वेलीवर कळी उमलणार असल्याची चर्चा सुरू झालीय. 


'पिंकविला'नं दिलेल्या माहितीनुसार, युवी आणि हेझलला यासंबंधी प्रश्न विचारला तेव्हा अद्याप आपण काहीच ठरवलं नसल्याचं तरी तिनं म्हटलंय. त्यामुळे, या बातमीवर शिक्कामोर्तब झालं तर लवकरच या दोघांच्या चाहत्यांना गोड सरप्राईज मिळू शकेल. 


युवी सध्या आयपीएलच्या दहाव्या सीझनमध्ये बिझी असला तरी हेझल मात्र त्याच्या अनेक सामन्यांना हजेरी लावताना दिसतेय.