नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फेब्रुवारी-मार्चमध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या दौऱ्यासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने टीम इंडियाला मोलाचा सल्ला दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला कमी लेखण्याची चूक करु नये. ऑस्ट्रेलिया एक मजबूत संघ आहे. भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करतोय मात्र त्यानंतरही त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखता कामा नये, असा सल्ला सचिनने दिलाय. 


ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना २३ ते २७ फेब्रुवारदरम्यान पुण्यात, दुसरा कसोटी सामना ४ ते ८ मार्चदरम्यान बंगळूरु, तिसरा सामना १६ ते २० मार्चदरम्यान रांची आणि चौथा सामना २५ ते २९ मार्चदरम्यान धरमशाला येथे खेळवला जाणार आहे.