मुंबई : रिओ ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारी बॅडमिंटन स्टार पी.व्ही सिंधुवर बक्षिस आणि पैशांचा वर्षाव होत आहे. अनेक राज्य सरकारांनी तिला बक्षिस जाहीर केलं आहे. भारताचा दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरने देखील तिला एक बक्षिस जाहीर केलं आहे. 28 ऑगस्टला सिंधुला सचिन BMW कार भेट देणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्ज पदक जिंकणाऱ्या सायना नेहवाल हिला देखील सचिनने कार भेट केली होती. याआधी २०१२ मध्ये अंडर-१९ चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या सिंधुला सचिनने स्विफ्ट कार भेट केली होती.


सिंधुला दिली जाणारी ही BMW कार त्याचा मित्र आणि माजी क्रिकेटपटू व्ही. चामुंडेश्वरनाथ स्पॉन्सर करणार आहे. सिंधुने रिओ ऑलिम्पिकच्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.