मुंबई : रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना टोमना मारणाऱ्या शोभा डे यांचा समाचार मास्टर ब्लास्टर भारत रत्न सचिन तेंडुलकरने घेतला आहे. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे विनोद नाही, अशा शब्दात डेंना सुनावले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ऑलिम्पिकमध्ये एक मेडल जिंकावे यासाठी आपले खेळाडू प्रयत्न करत असतात. रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना माझा पाठिंबा आहे. वर्षानुवर्ष हे खेळाडू सराव करत असतात, आणि जेव्हा थोडक्यात संधी चुकते आणि पराभव होतो तेव्हा त्यांना नक्कीच वाईट वाटते, असे मत सचिनने एका कार्यक्रमात व्यक्त केले.
 
जेव्हा वेळ तुम्हाला साथ देत नाही, निकाल अपेक्षेप्रमाणे लागत नाही तेव्हा खरी आपल्याला पाठिंब्याची गरज असते, असे सचिनने शोभा डेंच्या ट्विटवर सांगितले.



 
शोभा डेंचे ट्विट 


भारतीय संघाचे केवळ एकच लक्ष्य आहे. रिओला जा, सेल्फी काढा आणि खाली हात परत या. हा संधी आणि पैशांचा अपव्यय आहे.



वादग्रस्त ट्विटनंतर शोभा डे यांच्यावर सोशल मीडियावरुन जोरदार टीका करण्यात आली होती. तसेचअनेक खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती.