लंडन : इंग्लंडचा क्रिकेटर ऍलिस्टर कूकने नुकताच कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. १० हजार रन करणारा तो इंग्लंडचा पहिला, तर क्रिकेट विश्‍वातील बारावा फलंदाज ठरला आहे. क्रिकेट विश्‍वात अशी कामगिरी करणारा तो सर्वांत तरुण क्रिकेटर आहे. सचिनने हा विक्रम 31 वर्षे 10 महिने आणि 20 दिवस पूर्ण केलं होतं. कूकने ते ३१ वर्षात पूर्ण केलं आहे.


इंग्लंड कर्णधार ऐलिस्टर कूकने माझी तुलना 'जिनियस' सचिन तेंडुलकरसोबत करु नका असं म्हटलं आहे. सचिन तेंडुलकरच्या कसोटी क्रिकेटमधील धावा सर्वोत्तम आहेत. सचिन हा खूप जिनियस खेळाडू होता. मी जिनियस नाही. मी त्याच्यापासून खूप लांब आहे.