धोनीच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्यावर मास्टर ब्लास्टरची प्रतिक्रिया
भारताचा क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीने वनडे आणि टी-२० क्रिकेटचा राजीनामा दिल्यानंतर ट्विटरवर जोरदार धोनीची चर्चा आहे.
मुंबई : भारताचा क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीने वनडे आणि टी-२० क्रिकेटचा राजीनामा दिल्यानंतर ट्विटरवर जोरदार धोनीची चर्चा आहे.
ट्विटरवर तर धोनीच्या चाहत्यांची जोरदार टीवटीव सुरु आहे. अनेकांनी धोनीच्या निर्णयाबाबत दु:ख व्यक्त केलंय. तर अनेकांनी त्याला या निर्णयासाठी पाठिंबा दिलाय.
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही सोशल मीडियाद्वारे धोनीच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केलीये.