मुंबई : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरबाबतचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मेसेजमध्ये अर्जुन तेंडुलकर आणि प्रणव धनावडेची तुलना करण्यात आलीये. १६ वर्षाखालील संघात अर्जुनची निवड कऱण्यात आली आणि प्रणव धनावडेची नाही. त्यामुळे जोपर्यंत द्रोणाचार्य जिवंत आहे. तोपर्यंत एकलव्य असाच अर्जुनकडून हरत राहणार, असं या मेसेजमध्ये म्हटलंय.


मात्र या मेसेजमध्ये कोणतीही तथ्य नसल्याचे प्रणव धनावडेचे कोच मोबीन शेख यांनी स्पष्ट केलंय. संघ निवडीची प्रक्रिया वेगळी असते. तसेच प्रणवचे वय १६ वर्षे पूर्ण आहे, त्यामुळे तो सध्या अंडर १९ गटात आहे. त्याने जरी नाबाद एक हजाराहून अधिक धावा कऱण्याचा विक्रम केला असला तरी क्रिकेटमध्ये त्याला अजून मोठा पल्ला गाठायचा असे शेख म्हणाले.