लंडन : सचिन तेंडुलकरने मंगळवारी भारतीय टीमच्या नवनियुक्त कोच अनिल कुंबळेला एक महान खेळाडूचा दर्जा देत म्हटलं की, कुंबळे खेळाडुंना शिकवेल की, मॅचमध्ये महत्वाच्या संधी कशा आपल्या बाजूने करता येतील. तेंडुलकरशिवाय माजी कर्णधार सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या तिघांनी कुंबळेला भारतीय कोचच्या पदासाठी निवडलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन तेंडुलकरने म्हटलं की, 'अनिल कुंबळे एक उत्कृष्ठ खेळाडू आहे. तसंच एक उत्तम प्रतिस्पर्धी जो मैदानावर कोणतीही तडजोड नाही करत. तो प्रत्येक क्षणी जिंकवण्यासाठीच प्रयत्न करेल. २० वर्षात कुंबळे जे काही शिकलाय ते सगळं तो शेअर करेल.'


सचिन पुढे म्हणतो की, मॅचमध्ये नेहमी काही मोठ्या संधी येतात आणि या संधींचा कसं उपयोग करुन घेता येईल हे महत्त्वाचं आहे. तुम्ही काय ठरवता यापेक्षा तुम्हा त्यावर कसे खरं उतरता हे महत्त्वाचं आहे. खेळामध्ये तुम्हाला शिकायला मिळतं. तुम्हाला प्रत्येक दिवशी विजय मिळवता येत नाही कधी-कधी तुम्हाला पराभव देखील स्वीकारावा लागतो.'


तेंडुलकरला जेव्हा भारतीय टीमचे माजी डायरेक्टर रवी शास्त्री यांच्या नाराजी बद्दल विचारलं गेलं तेव्हा सचिन बोलला की, ‘आम्ही त्या बैठकीत जी काही चर्चा केली ती गोपनिय आहे. रवी शास्त्रीचं योगदान  शानदार आहे. त्याने खूप चांगली भूमिका निभावली. मी त्याच्यासोबत क्रिकेट खेळलो आहे आणि खेळच्या प्रती असलेली त्यांची भावना जाणून घेतली आहे.