सचिनचा ट्विटरवरुन चाहत्यांशी संवाद
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हिंदू नववर्षांच्या दिवशी ट्विटरवरुन चाहत्यांशी संवाद साधला.
मुंबई : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हिंदू नववर्षांच्या दिवशी ट्विटरवरुन चाहत्यांशी संवाद साधला.
यावेळी तब्बल २० हजाराहून अधिक ट्वीट करण्यात आले. #AskSRT हा हॅशटॅग ट्रेंडवर होता.
यावेळी चाहत्यांनी सचिनला वेगवेगळे प्रश्न विचारले त्यावर सचिनने मनमोकळ्यापणाने उत्तरे दिली. एका चाहत्याशी तर त्याने मराठीत संवाद साधला.
निवृत्तीनंतरचा पहिला दिवस कसा होता असा प्रश्न एका चाहत्याने सचिनला विचारला असता सचिनने आपण स्वत: चहा बनवला होता असं सांगितलं.