नवी दिल्ली :  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा आणि झहीर खान या सारखे क्रिकेट स्टार युवराज सिंग यांच्या कॅन्सर अभियानात सामील झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी सुमारे १०० कॅन्सरग्रस्त मुलांना शिक्षण देण्याची घोषणा करण्यात आली. 


वर्ल्ड कॅन्सर डे वर काल क्रिकेटर युवराजने आपले अभियान ' टु गेदर वी कॅन' (आपण मिळून करू शकतो) सुरू केले.


कॅन्सर विरोधात संघर्ष करताना युवराजने सांगितले की तो कॅन्सर अभियानासाठी पैसा उभा करणार आहे. 


ज्या कॅन्सर पीडित मुलांना आपला शिक्षणाचा खर्च करता येत नाही. त्यांचे कुटुंबियांचा सर्व पैसा इलाजासाठी जातो अशांना आधार देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे.