सिबु : भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपूट सायना नेहवालने गुरुवारी मलेशिया मास्टर्स ग्रांपी गोल्ड स्पर्धेत महिला एकेरीत क्वार्टरफायनलमध्ये मजल मारलीये. तर दुसरीकडे पुरुष एकेरीत अजय जयरामनेही क्वार्टरफायनल गाठलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायनाने इंडोनेशियाच्या हना रामदिनीला ४२ मिनिटे चाललेल्या खेळात २१-१७, २१-१२ असे दोन गेममध्ये हरवले. 


तर अजयरामने चीन तैपेईच्या सुयेह सुयान यीला २१-१२, १५-२१, २१-१५ असे तीन गेममध्ये पराभूत केले. क्वार्टरफायनलमध्ये सायानाचा पुढील सामना इंडोनेशियाच्या फितरियानी फितरियानीशी होणार नाही. तर जयरामसमोर क्वार्टरफायनलमध्ये इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुकाचे आव्हान असेल.