सारवाक(मलेशिया) : भारताची फुलराणी सायना नेहवालने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचे जेतपद पटकावलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फायनलमध्ये सायनाने थायलंडच्या पोर्नपॉवी चोचूवोंगला तिने २२-२०, २२-२० असे दोन गेममध्ये हरवत यंदाच्या वर्षातील पहिल्या वहिल्या जेतेपदाला गवसणी घातली. सात महिन्यानंतर तिने मिळवलेले पहिले जेतेपद आहे. 


दुखापतीतून सावरल्यानंतर तिने पहिलेच जेतेपद मिळवलेय. चोचूवोंगविरुधच्या लढतीदरम्यान दोन्ही गेममध्ये तिला चांगली झुंज मिळाली. मात्र दमदार खेळाच्या जोरावर तिने हे जेतेपद मिळवले.