सारवाक(मलेशिया) : भारताची फुलराणी सायना नेहवालने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेमीफायनलमध्ये सायनाने हाँगकाँगच्या यिप पुई यिन हिला २१-१३, २१-१० असे सहज गेममध्ये पराभूत केले. मागील वर्ष सायनाला दुखापतीने ग्रासले होते. दुखापतीतून बाहेर पडल्यावर तिने मिळवलेले यश हे निश्चितच तिचा आत्मविश्वास वाढवणारे ठरेल.


दोन्ही गेममध्ये सायनाने जबरदस्त खेळ केला. तिने संपूर्ण खेळावर आपले वर्चस्व गाजवले. पहिल्या गेममध्ये प्रतिस्पर्धीने सायनाला थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र सायनाच्या सरस खेळासमोर तिचा टिकाव लागू शकला नाही.