धोनीच्या निर्णय़ावर पत्नी साक्षीची पहिली प्रतिक्रिया
महेंद्रसिंग धोनीने बुधवारी वनडे आणि टी-२० क्रिकेट कर्णधारपदाचा राजीनामा दिला. धोनीच्या या निर्णय़ानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे व्यक्त केल्या.
मुंबई : महेंद्रसिंग धोनीने बुधवारी वनडे आणि टी-२० क्रिकेट कर्णधारपदाचा राजीनामा दिला. धोनीच्या या निर्णय़ानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे व्यक्त केल्या.
धोनीची पत्नी साक्षीनेही याबाबतची प्रतिक्रिया ट्विटरवरुन व्यक्त केलीये. धोनीच्या राजीनामाच्या निर्णयावर बोलताना साक्षीने ट्विटरवर असे लिहिलेय की, 'महेंद्रसिंग धोनी जगात असे कोणतेही शिखर नाही ज्याच्यावर तु चढू शकत नाहीस. मला तुझा गर्व आहे.'
धोनीने राजीनामा दिल्यानंतर साक्षीची ही पहिली प्रतिक्रिया आहे. धोनीने अचानकपणे बुधवारी हा निर्णय़ जाहीर केला. धोनीच्या या धक्क्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
दरम्यान, धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला तरी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो खेळणार आहे. याआधी २०१४मध्ये धोनीने अचानकपणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.