मुंबई : भारतीय क्रिकेट टीममधील एक यशस्वी गोलंदाज आणि सध्याचा टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळे पहिल्या परीक्षेत पास झाला आहे. विराट कोहलीच्या कॅप्टन्सीमध्ये भारतीय टीमने वेस्टइंडीजचा पराभव केला. ४ सामन्यांची या सिरीजमध्ये २-० ने भारतीय संघाने सीरीज जिंकली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळेचा पगार निश्चित केला आहे. कुंबळेला दरवर्षी 6.25 कोटी रुपये मिळणार आहेत. सध्या बीसीसीआयसोबत कुंबळेने फक्त एक वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट केला आहे. 


कुंबळेला मिळणारी सॅलरी ही रवि शास्त्रींना मिळणाऱ्या सॅलरीपेक्षा ७५ लाखांनी कमी आहे. पण माजी कोच गॅरी कर्स्‍टन आणि डंकन फ्लेचर यांच्या पगारानुसार कुंबळेला जास्त पगार मिळाला आहे. परदेशात  कोच यांना 3.4 कोटी रुपये पगार दिला जातो.