कोलून : हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडुंची विजयी घोडदौड सुरुच आहे. भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही.सिंधू आणि समीर वर्मा यांनी हाँगकाँग ओपनच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. पी.व्ही.सिंधूंनं चेयुंग नगानवर 21-14, 21-16नं मात केली आहे. तर समीर वर्माने डेन्मार्कच्या जॅन जॉर्गेनसनचा 21-19, 24-22 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.