पॅरिस : अग्रमानांकित सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीसच्या जोडीने फ्रेंच ओपन स्पर्धेत विजयी सलामी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सानिया-मार्टिना जोडीने दारिया कासासकिना व अलेक्सझॅंड्रा पानोव्हा या जोडीला 7-6,6-2 असे पराभूत करत महिला दुहेरी गटातील दुस-या फेरीत प्रवेश केला.


विम्बल्डन, अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन जोडीला आता कॅलेंडर स्लॅम पूर्ण करण्यासाठी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणे गरजेचे आहे.