सिडनी : भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि तिची चेक रिपब्लिकची जोडीदार बार्बोरा स्ट्रायकोव्हा यांनी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आपला विजयी झंझावात कायम ठेवाताना तिसऱ्या फेरीत मजल मारलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत सानिया-बार्बोराने ऑस्ट्रेलियाची समँथा स्तोसूर आणि चीनची झँग या जोडीला ६-१, ६-४ असे दोन सेटमध्ये सहज पराभूत केले. 


पहिल्या सेटमध्ये सानिया-बार्बोराने स्तोसूर-झँग जोडीवर सहज विजय मिळवला. दुसऱ्या सेटमध्ये स्तोसूर-झँगने कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला मात्र सानिया-बार्बोराने तो प्रयत्न हाणून पाडला आणि विजय मिळवत दिमाखात तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.