पुणे :  संजू सॅमसनने आयपीएलच्या दहाव्या सीझनमध्ये पहिले शतक झळकावले आहे. त्याने मंगळवारी पुण्याविरूद्ध खेळताना दिल्लीकडून शानदार खेळी करत १०२ धावा कुटल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजू सॅमसन दुसऱ्या षटकातच आदित्य तरे शून्यावर बाद झाल्यावर फलंदाजीसाठी आला. 


संजूच्या शानदार शतकाचा व्हिडिओ...


 




संजूने ६३ चेंडूत १०२ धावांची खेळी केली. यात त्याने ८ चौकार आणि ५ षटकार लगावले. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १६२ होता. 


या खेळीने संजू सॅमसन आयपीएलच्या दहाव्या सिझनमध्ये एका वेळी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. 


यापूर्वी कोलकता नाइट राईडर्सच्या क्रिस लिन याने ७ एप्रिलला गुजरात विरुद्ध ८ षटकार आणि ६ चौकारांसह ९३ धावा कुटल्या होत्या.