...आणि आयपीएलमध्ये लेकाचा खेळ पाहण्यासाठी पोहोचली आजारी आई
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि मुंबई इंडियन्सच्या बुधवारी झालेल्या सामन्यात जेव्हा शेन वॉटसन बाद झाल्यानंतर सरफराज खान फलंदाजीसाठी उतरला तेव्हा संपूर्ण मैदानात त्याच्या नावाच्या टाळ्यांचा गजर सुरु होता.
मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि मुंबई इंडियन्सच्या बुधवारी झालेल्या सामन्यात जेव्हा शेन वॉटसन बाद झाल्यानंतर सरफराज खान फलंदाजीसाठी उतरला तेव्हा संपूर्ण मैदानात त्याच्या नावाच्या टाळ्यांचा गजर सुरु होता.
सर्फराज आयपीएलमध्ये खेळत असल्यामुळे त्याच्या कुटुंबियांना चार तिकीटे मिळाली होती. मात्र आजारी असतानाही यावेळी सर्फराजची आई पहिल्यांदा आपल्या लेकाचा खेळ पाहण्यासाठी वानखेडेवर आली होती. आयपीएलच्या मॅचमध्ये सरफराजचा खेळ पाहण्याची पहिल्यांदा संधी त्याच्या घरच्यांना मिळाली होती.
या सामन्यात सरफराजने आपल्या चाहते तसेच कुटुंबियांना निराशही केले नाही. त्याने १८ चेंडूत २८ धावा केल्या. मात्र या सामन्यात मुंबईने मात्र बंगळूरुवर सहा विकेट राखून विजय मिळवला.