नवी दिल्ली :  टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीसंदर्भात एक धक्कादायक बातमी आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सौरभला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धमकीनंतर सौरभने आपला एक खास दौरा रद्द केला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे. ही धमकी एखाद्या संघटनेकडून देण्यात आली की व्यक्तीगत देण्यात आली या संदर्भात स्पष्टता अजून झालेली नाही. 


५ जानेवारीला गांगुलीला मिदनापूर येथे जायचे होते. पण ५ जानेवारीला त्याच्या घरी एक पत्र आले त्यात लिहिले होते. तुम्ही मिदनापूरला गेले तर जीवंत परत येणार नाही. त्यामुळे सौरभने मिदनापूर न जाण्याचा निर्णय घेतला.