तिसऱ्या टेस्टआधी इंग्लंडला धक्का, दुखापतीमुळे ब्रॉड बाहेर
भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये 246 रननं पराभव झालेल्या इंग्लंडच्या चिंता कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.
विशाखापट्टणम : भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये 246 रननं पराभव झालेल्या इंग्लंडच्या चिंता कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. इंग्लंडचा फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉड मोहालीमध्ये होणाऱ्या तिसऱ्या टेस्टला मुकणार आहे.
विशाखापट्टणममध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टवेळी ब्रॉडच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. यामुळे शनिवारपासून सुर होणाऱ्या तिसऱ्या टेस्टमध्ये ब्रॉड खेळू शकणार नाही. विशाखापट्टणम टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ब्रॉडनं भारताच्या चार विकेट घेतल्या होत्या. ब्रॉडच्या अनुपस्थितीमध्ये आता इंग्लंडला प्रभावी मोहालीत प्रभावी बॉलर शोधावा लागणार आहे. दरम्यान मुंबईत होणाऱ्या चौथ्या टेस्टसाठी आपण फिट होऊ असा विश्वास ब्रॉडनं व्यक्त केला आहे.