कोलकाता : टी-२० वर्ल्डकपसाठी भारतात दाखल झाल्यानंतर मीडियासमोर भारत प्रेम व्यक्त करणे पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रीदीला चांगलेच महागात पडले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व बाजूंनी त्याच्यावर टीकेचा भडिमार करण्यात आला. मात्र असं बोलण्यामागे आपला हेतू चांगला होता असही आफ्रीदीला नंतर स्पष्टीकरण द्यावं लागलं. 


या वादानंतर शाहीद आफ्रीदीने संघासोबतच्या सरावालाही अनुपस्थिती दर्शवली. संघासोबत सराव करताना शाहीदने अनुपस्थिती दर्शविल्याने त्याच्या न येण्यावरुनही चर्चा रंगली. मात्र त्याला ताप आल्याने तो सरावाला आला नसल्याचे पाकिस्तानी संघाचे मार्गदर्शक वकार युनुस यांनी सांगितले.