कराची : शाहिद आफ्रिदी हा मॅच फिक्सिंग करायचा, मी ते स्वत:च्या डोळ्यांनी बघितलं आहे, असा आरोप पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियादादनं केला आहे. मियादादच्या या आरोपाला आफ्रिदीनंही प्रत्युत्तर दिलं आहे. मियादाद फक्त पैशांसाठी खेळला, एवढ्या मोठ्या खेळाडूनं असं बेजबाबदार वक्तव्य करणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया आफ्रिदीनं दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं माझ्या निवृत्तीसाठी विशेष आंतरराष्ट्रीय सामना खेळवावा अशी मागणी आफ्रिदीनं केली आहे. यासाठी तो पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे कार्यकारी अध्यक्ष नजम सेठी यांची भेट घेणार आहे. फक्त पैशांसाठी आफ्रिदीला निवृत्तीसाठी विशेष आंतरराष्ट्रीय सामना खेळायचा असल्याचा आरोप मियादादनं केला होता.