मोहाली : टी-२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर निवृत्ती घेणार असल्याचे संकेत पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रीदीने मंगळवारी दिले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर बोलताना त्याने हे विधान केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा माझा शेवटचा सामना असेल. आता पुढे काय होते ते असे आफ्रिदी म्हणाला. मोहालीच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानला न्यूझीलंडकडून २२ धावांनी पराभूत व्हावे लागले. यापूर्वी भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर आफ्रीदीवर टीका सुरु झाली होती. 


वर्ल्डकपनंतर त्याला टीममधून डच्चू मिळणार असल्याचे संकेतही देण्यात आले होते. तसेच वर्ल्डकपसाठी भारतात आल्यानंतर आफ्रीदीने भारतात पाकिस्तानपेक्षा अधिक प्रेम मिळत असल्याचे वक्तव्य करुन पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंची नाराजी ओढवून घेतली होती. 


पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनीही आफ्रीदीवर जोरदार टीका केली होती. आफ्रीदीने आतापर्यंत २७ कसोटी, ३९८ वनडे आणि ९७ टी-२० सामने खेळलेत.