विराटने सामना हिरावून घेतला - आफ्रीदी
इडन गार्डनवर झालेल्या सामन्यात पराभूत झालेला पाकिस्तानचा कर्णधार शाहिदी आफ्रीदीने सामना संपल्यानंतर विराट कोहलीच्या खेळीचे मोठे कौतुक केले.
कोलकाता : इडन गार्डनवर झालेल्या सामन्यात पराभूत झालेला पाकिस्तानचा कर्णधार शाहिदी आफ्रीदीने सामना संपल्यानंतर विराट कोहलीच्या खेळीचे मोठे कौतुक केले.
विराटने आमच्याकडून सामना हिरावून घेतला. त्याने चांगली फलंदाजी केली, असे आफ्रीदी म्हणाला. यावेळी त्याने पिचबाबत तक्रारही व्यक्त केली. या प्रकारची पिच असेल अशी आशा नव्हती.
तसेच आम्ही येथे चांगली गोलंदाजी केली नाही. दबावात कसे खेळावे हे भारतीय क्रिकेटपटूंकडून शिकावे असा सल्लाही आफ्रीदीने यावेळी सहकाऱ्यांना दिला.
महेंद्रसिंग धोनीनेही या पिचबाबत आश्चर्य व्यक्त केले. पिचवर चेंडू इतका वळेल याचा अंदाज नव्हता. मात्र इतके माहीत होते की येथे चेंडू नक्कीच स्पिन होईल, असे धोनीने सांगितले.