मुंबई : आयपीएल सीजन ९ साठी आज अनेक खेळाडूंसाठी बोली लावण्यात आली. ज्यामध्ये आतापर्यंत एकूण ३५१ खेळाडूंच्या खरेदीवर बोली लावली गेली. रिचर्ड मेडलीने यांनी केविन पिटरसनपासून बोलीला सुरुवात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्या खेळाडूला किती लागली बोली (लिलाव प्रक्रिया) इथं क्लिक करा


पिटरसनला पुणे या संघाने ३ कोटी ५० लाखांना विकत घेतलं. तर डायन स्मिथसाठी गुजरातने २ कोटी ४० लाख रुपये मोजले. 


इशांत शर्मावर २ कोटी बेसीक किंमत ठेवण्यात आली. त्यानंतर ३ कोटी ८० लाख रुपयात तोही पुणे संघाने खरेदी केला. 


शेट वॉटसनवर ९ कोटी ५० लाख रुपयांची बोली लावत बँगलोरने आपल्या संघात समाविष्ट केला. 


आशिष नेहरला हैदराबाद टीमने ५ कोटी ५० लाख रुपयांना विकत घेतलं तर युवराज सिंगसाठी देखील ७ कोटी रुपये मोजत हैदराबादने युवीला आपल्या संघात समाविष्ठ करुण घेतलं.


एकूण २३० भारतीय आणि १३१ परदेशीय खेळाडूंवर आज बोली लावली जातेय. ज्यामध्ये केविन पीटरसन, युवराज सिंग आणि वॉटसनच्या बोलीवर सगळ्यांचं लक्ष होतं.