रिओ : मुस्लिम महिला खेळाडू इब्तीहाज मुहम्मद हिने हेल्मेटच्या आतून हिजाब घालून तलवारबाजी केली. रिओ ऑलिंपिकमध्ये तलवारबाजीमध्ये अमेरिकेच्या पथकात इब्तीहाज मुहम्मद सहभागी झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफ्रिका वंशाची अमेरिकन नागरिक असलेली इब्तीहाजने खेळाचा भाग म्हणून हिजाब परिधान केला होता. तिच्या असलेल्या श्रद्धेमुळे तिला हिजाब परिधान करुन खेळण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.


जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या इब्तीहाजने युक्रेनने ओलेना रावातस्का हिचा 15-13 असा पराभव केला. 


पण, अंतिम सोळामध्ये तिला फ्रान्सच्या सेसिला बर्डर हिच्याकडून 15-12 हिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. इब्तीहाज पुन्हा शनिवारी सांघिक प्रकारात खेळताना दिसणार आहे.